खान्देशगुन्हेजळगांवदेश-विदेश

राजस्थानमध्ये फोर्स ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; धुळ्यातील ९ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये फोर्स ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; धुळ्यातील ९ जणांचा मृत्यू

६ जण जखमी;  कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू

धुळे (प्रतिनिधी) : राजस्थानमधील कोटा येथे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलर वाहनाचा मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनात एकूण १५ प्रवासी असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.आहे. दरम्यान वाहन चालवत असताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मृतांमध्ये धुळे शहरातील शांतुषानगर, नवनाथ नगर तसेच शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवाशांचा समावेश आहे. अपघातग्रस्त वाहनात एकूण १५ व्यक्ती प्रवास करत होत्या

अपघातग्रस्त वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-18/CL/3005 असा आहे. दुर्घटनेतील मृत ९ जणांचे मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर जखमी झालेल्या ६ जणांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तींची नावे: १. सजन दौलत पवार २. उषाबाई सजन पवार ३. माधवी गणेश पवार ४. साऊ गणेश पवार ५. कैलास भगवान पवार ६. अनिता कैलास पवार ७. जानवी कैलास पवार ८. बाबूलाल दौलत पवार ९. सुशीलाबाई बाबुलाल पवार

अपघातातील जखमी व्यक्तींची नावे: मनीषा शरद पवार (४१ वर्षे), रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे. मयुरी शरद पवार (२० वर्षे), रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे. जगदीश कैलास पवार (१० वर्षे), रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे. श्रीजीत गणेश पवार (४ वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे. शरद बाबूलाल पवार (४५ वर्षे), रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे. गणेश सज्जन पवार (३२ वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे.

 

कोटा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे मृत आणि जखमींचा तपशील उपलब्ध झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेबाबतचे पुढील तपशील समोर येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button