खान्देशजळगांवसामाजिक

टिपू सुलतान जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जळगाव : टिपू सुलतान जयंतीनिमित्त हजरत उमर फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता तांबापुरा परिसरातील पंचशील नगर, फुकटपुरा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ. करिम सालार, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन मारुती अव्हाड, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सुनीलभाऊ महाजन, भाजपचे जिल्हा चिटणीस पितांबर भावसार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी समाजसेवक सोनुभाई कडक, वसिम बापू, आसिफ शाह बापू, आरिफभाई वायरमन, अमजद पठाण, इम्रानभाई टेलर, मोईद्दीनभाई शेख, लुकमानभाई शेख, मुस्ताक पिंजारी आदींसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र गौतम सुरवाडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

हजरत उमर फाऊंडेशनचे अध्यक्ष विकार कय्युम खान, उपाध्यक्ष अहमद खान, सचिव ईस्माईल खान, सल्लागार असलम काकर व जमीलभाई अत्तरवाले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सदस्य हासिम शेख, समीर शेख, बाबा खान, गुड्डू काकर, शब्बीर खान आणि मोहसिन शेख हे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button