खान्देशगुन्हेजळगांव

फत्तेपूर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; १५ पैकी १४ आरोपी जेरबंद

फत्तेपूर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; १५ पैकी १४ आरोपी जेरबंद

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; बीएनएस आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जून २०२६ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने परिसरातील परिस्थिती सध्या पूर्णपणे शांत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी देऊळगाव–कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत बसली असताना तेथे १५ जणांचा समूह आला. त्यानंतर दोघांना धमकावून त्यापैकी दोघांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या घटनेदरम्यान काही सहआरोपींनी आपल्या मोबाईल फोनवर संपूर्ण प्रकाराचे कथित व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले.

घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच तपासाचा आढावा घेतला.

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), कलम ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत १५ पैकी १४ मुख्य व सहआरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button