जळगावात श्रीराम रथाचे लालशाह बाबा दर्ग्यावर स्वागत

जळगावात श्रीराम रथाचे लालशाह बाबा दर्ग्यावर स्वागत
सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे पुष्पवृष्टी; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथोत्सवानिमित्त भिलपुरा येथील लालशाह बाबा दर्ग्यावर रथाचे आगमन झाल्यानंतर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पवृष्टी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून रथोत्सव समितीचे सदस्य, सेवेकरी आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अधोरेखित झाली.
रथोत्सव समिती आणि हिंदू बांधवांतर्फे अप्पा महाराजांचे परममित्र पीर लालशाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर व नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन आणि मुस्लिम बांधवांतर्फे श्रीराम रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रथोत्सव समितीचे सदस्य, मोगरी लावणारे सेवेकरी, चोपदार तसेच बंदोबस्तासाठी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून आणि गळाभेट घेऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सै. अयाज अली नियाज अली, प्रभाकर चौधरी, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, विलास हरी चौधरी, अनिकेत पाटील, जयवर्धन नेवे, राहुल चौधरी, भानुदास चौधरी, पंडित पाटील, अमोल चौधरी, सुरेश सपके, सुजित चौधरी, हाजी शकूर बादशाह, शेख हाजी जलालुद्दीन, जावेद अहमद, किशोर पाटील, रोहन शैलेंद्र, मोईन असगर, इम्तियाज अली, अकबर इब्राहिम, युसूफ अझीझ, आदिल गनी, मोहम्मद नईम आदी उपस्थित होते.


