जळगाव– युवाशक्ती फाऊंडेशन, एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे व प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन छत्रपती संभाजी नाट्यगृहात सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ११८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिबीराला एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे चे प्रा. डॉ. दिनेश भुतडा यांनी अभियांत्रिकी शिक्षण, प्रा. डॉ. रवी साहू यांनी व्यवस्थापन व वाणिज्य, प्रा. डॉ. संजय भागवत यांनी मुळ विज्ञान, डॉ. शुभिका मल्हारा व डॉ. पंकज साधवानी यांनी डिझायनिंग या विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबीरात 11 वी व 12 वी च्या 1185 विद्यार्थ्यांनी पालकांसह सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश राजपूत, उपाध्यक्ष हर्षल ठाकूर, नंदलाल गादिया, व्यंकटेश अयंगार हे उपस्थित होते. सूत्र संचालन जयदीप पाटील यांनी केले.
शिबीराच्या यशस्वितेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे, विश्वेश खंडेलवाल, शिवराज पाटील आदिंनी परिश्रम घेतले.