चाळीसगाव ;– तालुक्यातील वाघेले येथून २७ वर्षीय विवाहिता आपल्या ८ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, वाल्मिक भावराव मोरे वय ३४ हे हात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे पत्नी रोशनी वाल्मिक मोरे वय २७ ह्या २७ जून २०२३ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता मुलगी संस्कृती वआल्मिक मोरे वय ८ आणि मुलगा चेतन वाल्मिक मोरे वय ६ या दोघांना घेऊन निघून गेली. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता पत्नी मुले मिळून न आल्याने वाल्मिक मोरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून २९ रोजी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना शंकर जंजाळ करीत आहे.