खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : घरातील सर्वजण कामावर गेलेले असतांना घरात एकट्या असलेल्या निनाद शरद बोरनारे (वय ३१, रा. समृद्धी अपार्टमेंट, गौरव नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

शहराती गौरव नगरातील समृद्धी अपार्टमेंटमध्ये निनाद बोरनारे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याच्या आई, वडीलांसह बहिण हे सर्वजण सकाळीच कामावर निघून गेले.

त्यामुळे निनाद हा घरी एकटाच होता, त्याने घरी कोणीही नसतांना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी निनादचे काका हे घरी आले असता, त्यांना निनादने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने निनादला खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत निनादला मयत घोषीत केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मता मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button