गुन्हेदेश-विदेश

बिग ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला ; 9 जवान शहीद

विजापूर । वृत्तसंस्था:- छत्तीसगड मधील विजापूर येथे सुरक्षा दलाच्या वाहनावर मोठा नक्षलवादी हल्ला करण्यात आला असून यामध्ये 9 जवान शहीद झाल्याची घटना घडली असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

अबुझमद भागात संयुक्त कारवाई करून सुरक्षा दलाचे जवान आपल्या छावणीत परत येत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर ही घटना घडली. कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ सैनिकांची व्हॅन येताच नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून व्हॅन उडवून दिली  यामध्ये नऊ 9 जवान शहीद झाले असल्याची माहिती आयजी बस्तर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button