खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

बेटावद येथील इरफान बागवान बेपत्ता 

बेटावद येथील इरफान बागवान बेपत्ता 

जळगाव (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील मूळ रहिवासी व सध्या जळगाव शहरातील बागवान गल्ली येथे वास्तव्यास असलेले इरफान इसाक बागवान हे ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले असून, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत.

कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत जळगाव येथील संबंधित पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

चार दिवस उलटल्यानंतरही इरफान बागवान यांचा शोध लागला नसल्याने कुटुंबीय चिंतेत असून, नागरिकांनी त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक :

  • रईस भाई: ९४२३४९०४०५
  • शोएब: ९७६६२५५८५४
  • अश्फाक बागवान: ९४२२५५५५२३
  • इमरान: ९४२१००१०७८

इरफान बागवान दिसल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास वरील क्रमांकांवर अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात तातडीने माहिती देण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button