खान्देशगुन्हेजळगांव

नागलवाडी येथे तरुणाची आत्महत्या

चोपडा : तालुक्यातील नागलवडी येथील योगेश शांताराम बारेला (वय १९) या तरुणाने १९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नागलवाडी येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

योगेश बारेला हा चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील कला शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. चोपडा येथील धनवाडी रोडवरील आदिवासी वसतिगृहात तो रहात होता. काल सायंकाळी वसतिगृहात जेवण करून तो घरी गेला. तर १९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करून नागलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात या वेळी डॉ. चंद्रकांत बारेला, अमोल राजपूत, नीलेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे, प्रमोद पाटील, आदिवासी वसतिगृहाचे वार्डन संदीप पाटील आदी हजर होते. या प्रकरणी शहर पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button