नवी दिल्ली ;– ईशान्य राज्यातील मणिूपुर राज्य पुन्हा एकदा पेटले आहे. मणिपुरातील हिंसाचार अद्याप सुरूच असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यादरम्यान, गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा हिंसाचार उफळला आहे. अशातच येथील कांगपोकपीमध्ये गोळीबारा झाला असून यामध्ये २ दंगलखोर ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कुकी समाजाच्या हरोथेल या गावावर हल्लेखोरांनी हल्ला केला. याला कुकी समाजाकडूनही प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. मणिपुरात ३ मे रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला होता त्यानंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. मणिपुरात गेल्या ५८ दिवासांपासून हिसांचाराच्या घटना घडत आहेत. या दोन गटाच्या हिसांचारात आतापर्यंत राज्याचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
हिंसाचार सुरु असलेल्या ठिकाणी जात असताना दंगलखोरांकडून लष्कराच्या तुकड्यांवर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार केला गेला. लष्कराने केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे. दरम्यान, दोन जणांच्या मृत्यूनंतर गुरूवारी सायंकाळी इंफाळ शहरात तणाव निर्माण झाला. शेकडो लोक मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.