
जळगावात तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीमधून एक लाखाची रोकड लंपास
जळगाव I प्रतिनिधी ;-नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड एका हेल्मेटधारी चोरट्याने लांबवून पळ काढल्याची घटना १० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रिंगरोड परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शेख शोएब शेख शकील (वय २८, रा. गुलशनेरजा कॉलनी, पिंप्राळा) खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. शोएब शेख यांनी एका बँकेतून ८३ हजार रुपये काढून १७ हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये काढून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन दिले. यानंतर रिंग रोड वरील मशिदीत दुचाकी लावून नमाज पठणासाठी निघून गेले होते.
मात्र याठिकाणी काही नागरीकांनी आरडाओरड करून अज्ञात इसम कुणाच्या तरी दुचाकीच्या डिक्कीमधून काढत असल्याचे लक्षात आले. मात्र हेल्मेटधारी चोरटा हा थोड्या अंतरावर असलेल्या दुचाकीवर बसून पळून गेला.
हि घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून देखील ते मिळून न आल्याने शोएब शेख यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.