शासकीयजळगांव

Khandesh Times Impact : तहसील कार्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्याची बदली

खान्देश टाइम्स न्यूज | १ जुलै २०२३ | जिल्हाधिकारी कार्यालयातील चहा कट्ट्यावरची चर्चा या मथळ्याखाली गेल्या आठवड्यात खान्देश टाइम्स न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच अवैध वाळू वाहतुकीबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने देखील तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक परवेज शेख यांची जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबत प्राप्त तक्रारीनंतर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने तहसील कार्यालयातील महसूल सहायक परवेज शेख यांची जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखेत बदली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीतून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

दरम्यान, खान्देश टाइम्स न्यूजने देखील अवैध वाळू वाहतूक आणि आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा याबाबत वृत्त प्रकाशित केली होती. महसूल विभागातील ‘मंत्री’ निकटवर्तीय तरुण आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चहा कट्ट्यावर रंगणारी चर्चा आणि दलालांशी असलेले साटेलोटे खान्देश टाइम्स न्यूजने चव्हाट्यावर आणले होते. वृत्तानंतर बदली झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button