खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लांबविला

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अनिल मधुकर वाणी (वय-६०) रा. श्रीकृष्ण पार्क, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबियांसह राहत असून रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता ते बाहेरगावी नातेवाईक यांच्याकडे गेले असता अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण १ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आला, याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button