जळगाव :-येथील पांडे चौकातील एका दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या कारच्या कारणावरून एका महिलेसह दोन जणांनी हुज्जत घालून कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडली .या प्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव शहरातील प्रतापनगर येथील व्यवसायाने डॉक्टर असणारे डॉ. नीरज छगन चौधरी यांना आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास पांडे चौकातील नीलकमल हॉस्पिटल येथे एका रुग्णाची शस्त्रक्रिया करावयाची असल्याने ते सहकारी अजय सेनानी ,मंगेश दांगोडे, आदींनी हॉस्पिटल जवळ असणाऱ्या सार्वजनिक जागेवर कार पार्किंग करून शस्त्रक्रिया करण्यासाठी जात असताना हात गाडीवर नारळ विक्रीचे काम करणाऱ्या पंचवीस वर्षे वर्षीय तरुणाने येऊन इथे कार लावू नये अशी दमबाजी केली. डॉक्टर चौधरी यांनी शस्त्रक्रिया करून आल्यानंतर त्यांना कोणीतरी नारळ हात गाडीवाला तुमच्या गाडीची तोडफोड करत असल्याचे सांगितल्याने ते कार जवळ आल्यावर एका जणांनी डॉक्टर चौधरी यांची कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच डॉक्टर चौधरी यांचे सहकारी मंगेश दांगोडे यांना मारण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणाने नारळ कापण्याचा कोयता हातात घेऊन तो मारण्याचा प्रयत्न केला केल्याने दंगोडे यांना हातावर दुखापत होऊन रक्त आले. तसेच या ठिकाणी दुसरा युवक आणि एक महिला यांनी शिवीगाळ करून या ठिकाणी आलेल्या पोलिसांशी हूज्जत बाजी केली. याबाबत डॉक्टर चौधरी यांनी दिलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनला अर्जुन राठोड ,सोनू चव्हाण शिल्पा राठोड आदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.