गुन्हे

ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

खान्देश टाइम्स न्यूज | ४ नोव्हेंबर २०२३ | ठाणे आणि उल्हासनगर परिसरात वेगवेगळ्या १६ गुन्ह्यात फरार असलेला प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके याला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवात आला असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ठाणे शहर पोलीस ठाण्यातील गु.र.न.३४३/२०२३ मधील ३९४ वगैरे व इतर १६ गुन्ह्यातील फरार आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके रा.उल्हासनगर, जि.ठाणे हा जळगावात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, महीला पोलीस उप निरीक्षक रुपाली महाजन, सहाय्यक फौजदार दिनेश बडगुजर, कर्मचारी अमित मराठे व जुबेर तडवी यांच्या मदतीने त्यास वर्षी महोत्सव सिंधी कॉलनी येथून पकडण्यात आले.

पुढील कारवाईसाठी त्याला ठाणे क्राईम ब्रांच सहाय्यक निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव पोलिसांच्या कामगिरीचे जनमानसात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button