खान्देशगुन्हेजळगांव

बहाळ येथे तरुणाचा जमीनीवर आपटून खून

चाळीसगाव (प्रतिनिधी) :दुरुस्त करून दिलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याच्या रागातून एका गॅरेजवर करणाऱ्या तरुणाला त्याची हत्या केल्याची घटना बहाळ येथे घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश संतोष बोरसे कुंभार (वय २४) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बहाळ गावामध्ये आई, वडील, बहिण यांच्यासह राहतो. तसेच शिवशक्ती ऑटो गॅरेज हे बस स्टॉपवर त्याचे दुकान असून तेथे वाहन दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करीत होता. शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर निंबा मासरे याची दुचाकी दुरुस्त करून दिली होती. मात्र दुचाकी परत खराब झाली. संशयित ज्ञानेश्वर मासरे हा शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मद्यधुंद होऊन त्याची दुचाकी परत शिवशक्ती गॅरेज मध्ये महेश बोरसे यांच्याकडे आणली. त्यावेळेला महेश बोरसे हा दुसऱ्या व्यक्तीची गाडी दुरुस्त करीत होता. त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे याला, थोडं थांबा, ही गाडी झाल्यावर तुमची गाडी दुरुस्त करून देतो, असे सांगितले. मात्र त्याचा राग आल्यामुळे त्याने महेश बोरसे याला उचलले आणि जमिनीवर जोरात आपटले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. नागरिकांनी जखमी महेश बोरसे याला रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. मेहुणबारे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली.संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे फरार झाला होता. पोलिसांनी संशयिताळा रात्रीच त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महेश बोरसे याचे पिता संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून तपास सपोनी विष्णू आव्हाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button