जळगाव ;– वस्तूंची आवश्यक खरेदी करून बसमध्ये चढत असताना एका महिलेची पर्स आणि त्यामधील सोन्याचा हार असा ऐकनून ५० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवून पोबारा केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता रवींद्र राणे (वय-४६) रा.चोपडा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून ते आपल्या उदरनिर्वाह करतात. दरम्यान ब्युटीपार्लरसाठी लागणाऱ्या काही वस्तू घेण्यासाठी संगिता राणे या शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरात आलेल्या होत्या. वस्तू घेतल्यानंतर त्या टावर चौकातील जोगळेकर दुकानाच्या समोर बसची वाट बघत होत्या. दरम्यान बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये सोन्याचा हार, मोबाईल आणि रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान महिलेने तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल धांडे करीत आहे.