चोपडा ;-तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उत्तमनगार शिवारात उघडकीस आला असून पोलिसांनी तब्बल ८ क्विंटल ओला गांजा जप्त केला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी २४ रोजी सायंकाळी हि कारवाई केली आहे . दरम्यान आरोपी पसार झाला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील उत्तमनगर येथे रवी किलाऱ्या पावरा (वय २५) याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास मिळाली होती. त्या आधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शेतात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेल्या ओल्या गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेला ओला गांजा
पोलिसांनी कारवाई करत जमा केला आहे.
नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी पंचनामा केला, तर सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे या वेळी उपस्थित होते. ही कारवाईत झाली तेव्हा रवी किलाऱ्या पावरा फरार झाला आहे. त्याच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, ग्रामीण पो.नि. कावेरी कमलाकर, सहा फौ. देविदास ईशी, पोहेकॉ राकेश पाटील, किरण पाटील, पोकॉ रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.