खान्देशजळगांवशासकीय

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांचा ‘डीआरएम’ कडे प्रस्ताव -भुसावळला झाली बैठक

जळगाव,;- जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा जामनेर शहराच्या जवळ निश्चित करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी भुसावळ रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्याकडे आज दिला.

भुसावळ डीआरएम कार्यालयात जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज’ बाबत आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा प्रस्ताव डीआरएम यांना दिला.
रेल्वेचे संबंधित अधिकारी, तहसीलदार पंकज लोखंडे यावेळी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन रेल्वे स्थानक जामनेर शहराच्या जवळ, मुख्य रस्त्याच्या लगत आणण्यासाठी आणण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज डीआरएम श्रीमती पाण्डेय यांची भेट घेत नवीन रेल्वे स्टेशन जामनेर शहराजवळ आणण्याची विनंती केली आहे.

नवीन रेल्वे स्थानक जामनेर नगरपालिका हद्दीत येऊन रेल्वे लाईन मुळे प्लॉटचे विभाजन टळणार आहे. भूसंपादनाची गरज पडणार नाही. या नवीन रेल्वे स्थानकाच्या जागेचा मोबदला नगरपालिकेला देण्यात यावा किंवा जून्या रेल्वे स्थानकाच्या जागेवर नगरपालिकेला जागा द्यावी किंवा नवीन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तालुका क्रीडा संकुलास जागा देण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ डीआरएम यांना सादर केला आहे‌‌ तो त्यांनी स्वीकारला आहे.

रेल्वे व नगरविकास विभागाच्या वरिष्ठ पातळीवर या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यास नवीन रेल्वे स्थानक शहराच्या जवळ नवीन जागेत आकारास येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button