गुन्हेखान्देशजळगांव

मोठी बातमी : आयजींच्या पथकाचा जळगावात छापा, लाखोंचा गुटखा जप्त

खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव शहरात गुटखा विक्री बिनधास्त सुरू असून स्थानिक पोलिसांकडून कानाडोळा केला जात आहे. जळगावातील एमआयडीसी हद्दीत असलेल्या गुरूदेव नगरातील गोदामातून आयजींच्यापथकाने ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त केला. या सोबतच ९ लाख रुपये किमतीची २ वाहने व रोख २३ हजार रुपये असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मद्देमाल जप्त करीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भगवान साहेबराव पाटील (३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुलेट शोरुमच्या मागे गुरुदेव नगरात एका गोदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सापळा रचून शुक्रवार दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पथकाने गोदामात छापा टाकला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यासह दोन वाहने व रोख २३ हजार रुपये देखील पोलिसांनी जप्त केले.

पथकाने घटनास्थळाहून भगवान पाटील याला अटक केली असून असून पाटील नामक व्यक्ती फरार झाला आहे. या प्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोहेकॉ रवींद्र पाडवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत. दरम्यान, आयजींचे पथक जळगावात येऊन कारवाई करून गेल्याने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच इतक्या मोठ्या गोदाममध्ये दोन वाहने आणि लाखोंचा गुटखा असताना केवळ एकच व्यक्ती पथकाच्या हाती लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुटखा क्षेत्रात जळगावातील अनेक माफिया सक्रिय असून त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button