जळगाव;– जळगाव जिल्हा कारागृहात कैदी मुलाला भेटण्यासाठी येणाऱ्या आईला २ हजारांची लाच मागणाऱ्या दोन महिला पोलीस आणि एक पोलिसाला धुळ्याच्या अँटीकरप्शन विभागाने आज ८ रोजी अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
.भिमा उखडु भिल, सुभेदार तसेच पुजा सोपान सोनवणे व हेमलता गयबु पाटील, महिला कारागृह पोलीस असे कारवाई करून गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांचे नाव आहे
. ५८ वर्षीय तक्रारदार या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहुर येथील अंगणवाडीत अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कार्यरत आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध जिल्हापेठ पो.स्टे. जळगांव येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयांत त्यास अटक करण्यात येवून तो सध्या जिल्हा कारागृह, जळगांव येथे न्यायालयीन कोठडीत आहे. तक्रारदार त्याचे मुलास वेळोवेळी भेटण्याकरीता, जिल्हा कारागृह, येथे गेल्या असता ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, कारागृह पोलीस पुजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्याचेकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी २,०००/- रु मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी दि ०७ नोव्हेंबर रोजी त्याचेविरुध्द कारवाई होणेकरीता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांचेकडे लेखी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृह, जळगांव येथे जावून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पुजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करुन देण्यासाठी २,०००/- रु लाचेची मागणी केली.भिमा उखडु भिल, सुभेदार यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगून महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुध्द जिल्हा पेठ पो.स्टे येथे भ्गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
यांच्या पथकाने केली कारवाई
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे या पथकाने केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले .