खान्देशगुन्हेजळगांव

धक्कादायक : गर्भवती महिलेने उचलले टोकाचे पाऊल

यावल ;- गर्भवती महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मनवेल गावात उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय-२२) रा. मनवेल ता.यावल असे मयत विवाहितेचे नाव आहे.

शितल कोळी ही महिला आपल्या पती व कुटुंबासह वास्तव्याला होत्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी घरात कुणीही नसतांना तिने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. पती विजय कोळी हे घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

या घटनेची खबर मयताचे सासरे भगवान दौलत कोळी वय५७ वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button