सामाजिक
शिक्षण घरच्या विद्यार्थ्यांसोबत अभेद्या फाउंडेशनने साजरी केली दिवाळी
जळगाव l १२ नोव्हेंबर २०२३ l शहरातील तांबापुरा ही कष्टकरी, चाकरमान्यांची वस्ती येथे अभेद्या फाउंडेशन तर्फे शिक्षण घर उपक्रम चालवला जातो कचरा वेचून उपजीविका करणाऱ्यांची मुले मुलांना ज्ञानदान येथे केले जाते यंदाही अभेद्यातर्फ शाळाबाह्य मुले आणि त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
अभेद्या फाउंडेशनच्या वैशाली झाल्टे शिक्षणघरातील शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे घरी गाठले तेथे जावून त्यांच्या पालकांशी संवाद साधून दिवाळी निमित्त मिठाई फराळाचे वाटप केले वंचित उपेक्षित घटकांसोबत सण उत्सव साजरे केल्याने नव प्रेरणा मिळते असं विश्वास त्यांनी छोट्याखानी कार्यक्रमात व्यक्त केला आगामी काळात शिक्षणघर उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याची मानस त्यांनी बोलून दाखवली दरम्यान विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ व मिठाई मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.