गुरुवारी सुद्धा लायक जामीनदार नसल्याने आरोपीचा जामीन नाकारला
जळगाव l १६ नोव्हेंबर २०२३ l जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे १४ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२०/२३ भादवी ३५४ च्या प्रकरणी जळगाव च्या शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद तसेच जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून आरोपी निलेश ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच डॉक्टर चित्ते, व सहकारी डॉक्टर वंदना चौधरी व दवाखान्यातील इतर कर्मचारी त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले तर आमदार राजु मामा भोळे यांनी शिष्टमंडळा समक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्याशी मोबाईलवर स्पीकर ऑन करून चर्चा केली व सदरचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून आरोपी विरुद्ध पोलीस कोठडी न घेतल्याने त्याचा जामीन मंजूर झाला. आता तरी त्याच्यावर गंभीर प्रकरण असल्याने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती केली.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश :
मन्यार बिरादरीचे फारुक शेख, एडवोकेट आमिर शेख, इमदाद चे मतीन पटेल, तांबापुर चे शेख आबिद, अनिस शहा,अमजद खान, सलमान खान,साहिल पठाण आदींची उपस्थिती होती.
न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन मंजूर केला नाही :
१५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात आरोपीचे जामीनदार यांनी आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध न केल्याने तसेच लायक जामीनदार नसल्याने जामीनदाराचा जामीन अर्ज रद्द करण्यात आला होता.
१६ नोव्हेंबर रोजी पुनश्: आरोपीच्या वतीने जामीनदारांनी अर्ज दाखल केला असता फिर्यादी तर्फे एडवोकेट आमिर फारुक शेख यांनी सदर जामीनदार हे हॅबिट्युअल जामीनदार असून त्यांनी यापूर्वी यावल चाळीसगाव येथे सुद्धा जामीन दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असता न्यायालयाने त्यावर विचारपूस केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने तो अर्ज सुद्धा नामंजूर करण्यात आला.
शेवटी 50 हजार रुपये रोख भरून जामिन :
आरोपीच्या वतीने ५० हजार रुपये रोख कॅश शुअर्टी भरून गुरुवारी संध्याकाळी जामीन घेण्यात आला.