खान्देशगुन्हेजळगांव

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

पहूर, ता. जामनेर : प्लग आणि वायरची जोडणी करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे २२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. पहुर येथील शिवनगर भागात राहणाऱ्या दीपक सुरेश वारुळे हा तरुण प्लग आणि वायर यांची जोडणी करत होता.

या वेळी त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. शेजारील रहिवाशांनी त्यास तातडीने उपचारार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत दीपक वारुळे याच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button