विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा चौथा दिवस
पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका
जळगाव l २३ नोव्हेंबर २०२३ l नाशिक पोलीस परिक्षेत्र अंतर्गत विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेअंतर्गत गुरुवारी सायंकाळी जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण कबड्डी सामना पार पडला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सुरुवातीला आघाडीवर असलेला जळगाव संघ नंतर पिछाडीवर गेला मात्र शेवटच्या ५ मिनिटात जळगाव संघाने दमदार प्रदर्शन करीत बाजी मारली. विजयानंतर सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ठेका धरला होता.
३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पोलीस कवायत मैदानावर सुरू असून गुरुवार दि.२३ नोव्हेंबर रोजी दिवसभरात मैदानावर खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, हॅण्डबॉल, स्विमिंग स्पर्धा पार पडल्या तर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कबड्डी, धावणे, लांब उडी, अडथळ्यांची शर्यत, उंच उडी, गोळा भेक, भाला भेक, मैदानी खेळ, भारोत्तलन पार पडले. विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण संघ सहभागी झाले आहेत.
खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी दिवसभरात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस गृह उपअधीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस वेलफेअर शाखेच्या रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ.विशाल जयस्वाल, महेश शर्मा, लिलाधर कानडे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पोटे आदी उपस्थित होते.
गुरुवारी पहिल्या सत्रात मैदानी क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळांमध्ये ४०० मीटर धावणे स्पर्धेत महिला गटात अश्विनी जाधव प्रथम, कीर्ती भिसे द्वितीय, आरती पाटील तृतीय, ८०० मीटर धावणे स्पर्धेत महिला गटात चंदा मुंडे प्रथम,बरत्नमाला घरटे द्वितीय, पल्लवी जाधव तृतीय, १५०० मीटर धावणे स्पर्धेत मंजू किशोर खंडारे प्रथम, मंजू फुलचंद सहानी द्वितीय, चंदा मुंडे तृतीय, ४०० मीटर धावणे स्पर्धेत पुरुष गटात अंकुश पावरा प्रथम, पवन चव्हाण द्वितीय, विशाल सपकाळे तृतीय, ८०० मीटर धावणे स्पर्धेत पुरुष गटात अंकुश पावरा प्रथम, शिवा बरबडे द्वितीय, निलेश राठोड तृतीय, १५०० मीटर धावणे पुरुष गटात संतोष रामा बुचडे प्रथम, विजय चांदा द्वितीय, सोमनाथ आगवणे तृतीय क्रमांक पटकावला. थाळीफेक महिला गटात अश्विनी होले प्रथम, प्रतिभा जगताप द्वितीय, यमुना परदेशी तृतीय, पुरुष गटात भूषण चित्ते प्रथम, तुलसीदास चौधरी द्वितीय, जिब्राहील शेख तृतीय राहिले.
भारोत्तलन पुरुष स्पर्धेत ३३ किलो गट अक्षय वाडे प्रथम, ६१ किलो गट पवन चव्हाण प्रथम, ६७ किलो गट संदीप खैरनार प्रथम, अश्विन कुमार कुमावत द्वितीय, सोपान गायकवाड तृतीय, ७३ किलो गट संदीप निकम प्रथम, विशाल पांढरे द्वितीय, जगदीश कंडाळे तृतीय, ८१ किलो गट मयूर पवार प्रथम, सुरज झोटिंग द्वितीय, सागर गायकवाड तृतीय, ८९ किलो गट जितेंद्र सोनवणे प्रथम, सुरेश नेटके द्वितीय, ९६ किलो गट पारस देशमुख प्रथम, दीपक पाटील द्वितीय, १०२ किलो गट गणेश चौबे प्रथम, प्रवीण कदम द्वितीय, सागर राऊत तृतीय, १०९ किलो गट शुभम पाटील प्रथम, १०९ किलो गट तौफिक शेख प्रथम, ४५ किलो गट भाग्यश्री कापडणीस प्रथम, ४९ किलो गट मंजू शहाणे प्रथम, मंजुषा सावळा द्वितीय, ५६ किलो गट जागृती काळे प्रथम, दिपाली सोनवणे द्वितीय, अर्चना थोरात तृतीय, ५९ किलो गट प्रियंका झाल्टे प्रथम, रामकला राठोड द्वितीय, प्रियंका नरवाडे तृतीय, ६४ किलो गट राजश्री शिंदे प्रथम, साधना गडाख द्वितीय, ७१ किलो गट वर्षा कदम प्रथम, किशोरी देशपांडे द्वितीय, ७६ किलो गट सोनाली काटे प्रथम, जयश्री मराठे द्वितीय, ८१ किलो गट अश्विनी भोसले प्रथम, ८७ किलो गट अश्विनी गिरी प्रथम, ८७ अधिक किलो गट मीनाक्षी तोंडे प्रथम, गौरी पठाडे द्वितीय क्रमांकावर राहिले.
बास्केट बॉल स्पर्धेत महिलांचा सामना जळगाव विरुद्ध नाशिक शहर चांगलाच चुरशीचा ठरला. सामन्यात जळगाव संघाकडून खेळताना जळगाव संघाने १२ गोल करून विजय मिळवला. नाशिक शहर संघाला केवळ २ गोल करता आले. बास्केट बॉल अंतिम सामन्यात विजयी झाल्याने जळगाव संघाला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तब्बल ६ वर्षांनी पहिल्यांदाच जळगाव संघ अंतीम सामन्यात विजयी ठरला आहे. पुरुषांच्या कब्बडी सामन्याने स्पर्धेत चांगलीच रंगत आणली. आक्रमक खेळाचे प्रदर्शन केल्याने जळगाव संघ विजयी ठरला. खेळाडू रामकृष्ण पाटील आणि सुधीर साळवे यांच्या अचूक नियोजनामुळे विजय शक्य झाला.