चाळीसगाव;- तालुक्यातील हिंगोली खुर्द येथे बंद घरात प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकर मधून अज्ञात चोरट्यांनी 49 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार 9 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नारायण तुकाराम पाटील वय 72 हे व्यावसायिक असून हिंगोली तालुका चाळीसगाव येथे राहतात. 3 जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून 49 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर नारायण पाटील यांनी फिर्याद दिल्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फोन प्रवीण सपकाळे करीत आहे.