खान्देशगुन्हेजळगांव

बँकेच्या एटीएममधून २० हजारांची बॅटरी लांबवली

भुसावळः शहरातील निसर्ग प्लॉझा कॉम्प्लेक्समधील सेंट्रल बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची बॅटरी लांबवली. ही चोरी दि.१० ते १३ नोव्हेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेंट्रल बँकचे शाखा प्रबंधक प्रशांत भारतराव बेहरे (सिद्धीविनायक अपार्टमेंट, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी निसर्ग प्लॉझा कॉम्प्लेक्समधील सेंट्रल बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवल्याची तक्रार नोंदविण्यात आला आहे. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button