भुसावळ ;- तालुक्यातील कुरा पानाचे गावातील बस स्टँड चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या जवळील १५ हजार पाचशे रुपयांची रोकड अज्ञात पाच जणांनी जबरदस्तीने हिसकावून अन्य साक्षीदारांकडून 66 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी राजू रूपचंद चौधरी (वय 53) हे चार डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावातील बस स्टँड चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या वेळी आले असता , तेथे अज्ञात पाच इसमांनी जबरदस्तीने त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पाकीटातून पंधरा हजार पाचशे रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली . तसेच त्याच पाच अनोळखी इसमांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ठिकाणी हजर असलेल्या इतर साक्षीदारांच्या खिशातून 66 हजार रुपयांची चोरी असा एकूण 81 हजार पाचशे रुपये रोख चोरून नेल्याप्रकरणी राजू चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पाच अनोळखी इसमांविरुद्व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.