जळगाव ;- तालुक्यातील दापोरा येथे रात्रंदिवस वाळू माफियांकडून होणारा अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांनी नदीपात्रात जाणारे रस्ते खोदले.
यावेळी तलाठी मयूर महाले ग्रामसेवक दिलीप पवार सरपंच माधवराव गवंदे यांचे सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक सुरु असल्यानं नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने हा अवैधरित्या चालणार वाळूचा उपसा रोखण्यासाठी ग्रामस्थानी पुढाकार घेऊन जेसीबीद्वारे नदीपात्रात जाणारे रस्ते खोदले.
ज्यामुळे वैध वाळू वाहतूक यामुळे रोखली जाऊ शकते. तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे याला आला बसेल. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिली.