भुसावळ;- भुसावळ शहरातील नॅशनल हायवे वरील हॉटेल तनरीका समोर उड्डाणपुलावर कापसे ऑटो मोबाईलच्या समोर एकाच्या दुचाकीला कट मारून अडवून सोबत त्याच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कापड व्यापाऱ्याजवळील34 हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की न्यू डायमंड नगर येथील राहणारे कापड व्यावसायिक किशोर रामेश्वर सदावर्ते वय 31 हे 15 ऑगस्ट रोजी च्या रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना भुसावळ शहरातील नॅशनल हायवे वरील हॉटेल तनरीका समोरील उड्डाणपुलावर कापसे ऑटोमोबाईल च्या समोर त्यांच्या दुचाकीला कट मारून अडविले. त्यानंतर तिघांनी दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करून सदावर्ते यांच्या जवळील 15 ग्राम वजनाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, दोन ग्रॅम सोन्याचे वजनाचे चार हजार रुपये किमतीचे लॉकेट ,कपडे ठेवण्याची बॅग, पाचशे रुपये रोख ,आधार कार्ड ,स्टेट बँकेचे एटीएम, लायसन्स व पॅन कार्ड असलेली बॅग असा एकूण 34 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तिघांनी जबरी चोरून नेला. याप्रकरणी किशोर सदावर्ते यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.