खान्देश टाईम /सुभाष धाडे
मुक्ताईनगर ;– तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ म्हशींचे तब्बल ५४ पारडूची निर्दयतेने वाहतूक करणारे कंटेनर मुक्ताईनगर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. यावेळी ५४ पारडूंची सुटका करत वाहन कंटेनर ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून एका कंटेनर क्रमांक (आरजे ११ जीबी ९४८७) मधून म्हशींचे ५४ पारडूंची दाटीवाटीने निर्दयतेने अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत बुधवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता डोलारखेडा फाट्याजवळ सापळा रचून म्हशींचे पारडूने भरलेले कंटेनर ताब्यात गेले. यावेळी पोलिसांनी पाडूंची सुटका केली आणि कंटेनर हा ताब्यात घेतला. दरम्यान पोलीस पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहनेवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक मोहम्मद अहसान मोहम्मद अब्दुल गफार वय 35 रा. फिरोजपुर जि. मेवाड राज्य हरियाणा आणि आजम खान अब्दुल हमीद वय 21 रा.बुकारका ता. फिरोजपुर जि.मेवात राज्य हरियाणा या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.