खान्देशजळगांव

मागासवर्गीय उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदवावेत

जळगाव,;- जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केले आहेत‌. या सदस्यांच्या जातवैधता प्रस्तावाबाबत काही आक्षेप असल्यास जिल्हा समितीकडे २७ डिसेंबरपर्यंत नोंदवावेत. असे आवाहन जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य व्ही एम वाकुलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मागासवर्गीय उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा समितीकडे अर्ज प्राप्त झाले आहेत‌. जे उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले होते. अशा उमेदवारांच्या अर्जावर समितीस्तरावर कार्यवाही सुरु असून निवडून आलेल्या उमेदवारांच्या दाव्याबाबत कोणाला काही हरकत, किंवा आक्षेप असेल अशांनी २७ डिसेंबर २०२३ पर्यंत समितीस्तरावर आपले जे काही हरकत, आक्षेप, लेखी स्वरुपात शपथपत्रावर (Affidiviate) पुराव्यासह सादर करण्यात यावे. वैधता प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी. तसेच साध्या कागदावर निनावी, पुराव्याशिवाय घेतलेल्या आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही. असे श्री.वाकुलकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button