जळगाव;- शहरातील भोईटे नगर परिसरातून घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील एक लाख रुपये किमतीच्या चार पोते भरलेल्या 200 किलो तांब्याच्या वायरी 35 हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ ते ८ रोजीच्या दरम्यान घडली असून हा प्रकार ८ रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला.
या प्रकरणी केतन भागवत सरोदे रा. भोईटे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.