खान्देशजळगांवशासकीय

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे

जळगाव;- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. अध्यक्ष : योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,उपाध्यक्ष :किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर, सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव

वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले.

महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button