
विविध सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक संस्थातर्फे वकफ संशोधन बिल मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव येथील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय इत्यादी संस्था द्वारे वक्फ संशोधन बिल सरकारने मागे घ्यावा. हे बिल भारतीय संविधान व मुस्लिम समाज यांच्या विरोधी असल्याने हे बिल मागे घेण्यात यावे. यासाठी महामहीम राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांना मां.जिल्हाधिकारी यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले.
निवेदन देणारे संस्था व पदाधिकारी
मजलिस मुशावेरत महारष्ट्र चे सचिव व इकरा चे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, उलमा कौन्सिल चे अध्यक्ष काजी मुजम्मिल नदवी, जमात ए इस्लामी हिंद चे सोहेल अमीर, जमियत ए उलमा ए हिंद चे सह सचिव डॉ.रागीब अहमद, एमआयएमचे रियाज बागवान, खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी इब्राहिम खाटिक व अल्ताफ खाटीक , समाजवादी पार्टी चे रिजवान जहागीरदार, अमन फाउंडेशन चे शाहिद मेंबर, कादरिया फाउंडेशन चे अध्यक्ष फारुख कादरी, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, मदिना मस्जिद चे सचिव शब्बीर गुलशेर व सय्यद सादिक, बिस्मिल्ला मस्जिद चे मुश्ताक बादली वाला, शिकलगर समाजाचे अफझल खान पठाण, जमियत चे मौलाना मोहम्मद शाहिद, इदगाह ट्रस्ट चे जकी पटेल, मशिद ए लतिफ चे अध्यक्ष शेख निसार काकर, एम पी जे चे महमूद खान, भारत मुक्ती मोर्चा चे फहीम पटेल, हजरत बिलाल संस्थे चे अध्यक्ष अकील पहिलवान व इतर सामाजिक कार्यकर्ते ,यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.