जळगाव ;- तालुक्यातील चिंचोली शिवारात असलेल्या मेडिकल कॉलेज बिल्डिंग हॉस्पिटलच्या साइटवर असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या बांधकाम साहित्याचे चोरी झाल्याचा प्रकार ९ रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की, चिंचोली शिवारात मेडिकल कॉलेज आणि बिल्डिंग हॉस्पिटलचे काम सुरू असून या ठिकाणी स्केअर ट्यूब ,इंडियन चैनल,स्टील रॉड असे पंचवीस हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी आठ ते नऊ रोजीच्या दरम्यान लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी स्टोअर किपर नितीन भास्कर धाई तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे..