खान्देशगुन्हेजळगांव

जळगावातून दोघांचे मोबाईल लांबवीले

जळगाव;- दोन जणांचे मोबाईल शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ वेगवेगळ्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १० डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ रिक्षाचालक प्रविण निंबा पाथरे वय-३५ रा. कुंभारवाडा,जळगाव हे रिक्षाजवळ उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर दुसऱ्या घटनेत सकाळी ११ वाजता बाळासाहेब भिका पाटील वय-५६ रा.सुरक्षा नगर, खोटेनगर, जळगाव हे छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावरून पायी जात असतांना त्यांच्या खिश्यात मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी देखील शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दोघांनी दिलेल्या तक्रारीवरूनशहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ आणि राजकुमार चव्हाण हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button