निधनजळगांव

साश्रू नयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप शहिद जवान राहुल माळी अनंतात विलीन

जळगाव l ३० जून २०२३ l भडगाव प्रतिनिधी l तालुक्यातील गुढे येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलातील हवालदार राहुल श्रावण माळी वय ३३ हे भारत बांगलादेश सिमेवरील पश्र्चिम बंगाल येथील काचनपुरा येथे देशसेवा बजावत असताना त्यांना दि. २७ रोजी रात्री वीर मरण आले ही बातमी गावात आल्यावर कुटुंब व गाव शोकमग्न झाले.शुक्रवारी  सकाळी १०:३० वाजता त्यांचे पार्थिव मुळगावी आले घरी पत्नी, मुले शिव, शंभू आई,वडील,दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे व नातेवाईक मित्र परिवार, ग्रामस्थांनी मुखदर्शन घेतले तेव्हा कुंटुबासह अनेकांना अश्रू अनावर झाले या ठिकाणी आरती करण्यात आली.या नंतर तिरंगा ध्वज व तिरंगा फुगे,पताका व फुलांनी सजविलेल्या टॅक्टरवरुन त्यांची अंत्ययात्रा गावातील मुख्य गल्लीतून काढण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या व तिरंगा पताकांनी सजविलेल्या होत्या या वेळी ठिक ठिकाणी श्रध्दांजली बॅनर लावण्यात आले होते.या वेळी भारत माता की जय, शहीद जवान राहूल माळी अमर रहे, अशा घोषणांनी गाव दणाणून गेले होते. ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.अंत्ययात्रेत अग्रभागी बॅन्ड पथकवर देशभक्ती पर गित गायली गेली रॅलीत नानासाहेब कृ. दे.पाटील स.मा विद्यालय विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली होती यानंतर गावापासून दोन कि. मी. अंतरावर असलेल्या गुढे फाट्यवर मोकळया जागेवर त्यांच्या पार्थिवाला मानवंदना, बिगुल वाजवून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी पुष्प चक्र अर्पण करण्यात आले या नंतर शहिद जवान यांच्या दोन्ही लहानग्या शिव व शंभू यांनी वडिलांना मानवंदना सॅलूट करत अखेरच  निरोप देत अग्नीडाग दिला.


हवालदार राहुल माळी हे १३ वर्षापासून भारतीय सेनेत दाखल झाले होते. दोन महिन्याभरापूर्वी ते गावीआई वडील भाऊ यांना भेटण्यासाठी सहपरिवार आले होते यायानंतर ते सहपत्नीक पश्र्चिम बंगाल येथील काचनपुरा येथे गेले होते ही त्यांची अखेरची भेट ठरावी हे नियतीला माहित असावी ते देशसेवा बजावत असताना त्यांना दि.२७ रोजी रात्री वीरमरण आले.त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देऊन त्यांचा पार्थिव देह आज विशेष विमाने संभाजीनगर येथे आला आणि तेथून आज सकाळी गांवी १०:३० वाजता गावा आला आपल्या गावाच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गाववाशीयांनी व मित्र परिवार तीन दिवसांपासून तयारी लागला होता त्यांचा पार्थिव देह गावात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात हजारो लोकांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंतीम दर्शन घेत अश्रूंचा बांध फुटला मित्र परिवार यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी संपूर्ण गावात रांगोळी पताका ध्वज श्रध्दांजली  बॅनर लावण्यात आली होती. संपूर्ण गावात अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हजारो च्या संख्येने लहान मुले, पुरुष महिला तरूण कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते गावा जवळच असलेल्या गुढे फाट्यावर मोकळया जागेवर त्यांचा पार्थिव आणण्यात आला.यावेळी त्यांच्या कुंटबाबाबत व राहुल माळी सैन्यात कसा दाखल झाला व तेथील कामगिरी बाबत त्यांच्या आठवणी जाग्या केल्या गेल्या यावेळी आमदार किशोर पाटील,माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,माजी जि.प सभापती विकास पाटील, महानंदा चे संचालक प्रमोद पाटील बाजार समिती उपसभापती पी ए पाटील, माजी जि प सदस्य डॉ उत्तमराव महाजन, शेतकरीसंंघाचे व्हा चेअरमन भैय्यासाहेब पाटील, शिवसेना तालुका प्रमुख भुरा आप्पा योजना ताई  पाटील,माजी चेअरमन हिरामण चौधरी, चाळीसगाव तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष योगेश भोकरे आदी सर्व पक्षातील आजी माजी पदाधिकारी तसेच जिल्हा सैनिक बोर्ड अधिकारी काकडे तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील निरीक्षक राजेंद्र पाटील गटविकास अधिकारी वाघ यांनी मानवंदना दिली  व पुष्प चक्र अर्पण करण्यात आले यानंतर शहिद जवान राहुल माळी यांच्या सोबत सैन्य दलातील 459 ए एम सी चे सुभेदार चंद्रशेखर व हवालदार के पी मोगल यांनी पार्थिव वरील तिरंगा ध्वज वीर पत्नी ज्योती  माळी यांच्या कडे सन्मान पूर्वक देण्यात आला.यानंतर गावाच्या वतीने डॉ उत्तमराव महाजन यांनी व सर्वपक्षीय व जिल्हाच्या वतीने महानंदचे संचालक प्रमोद पाटील यांनी श्रध्दांजली वाहीली यावेळी शहीद जवान राहुल माळी व सागर पाटील यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येईल असे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले. नंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी जयहिंद महाराष्ट्र सैनिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील माजी सैनिक वाल्मिक गरूड, विकास देवरे तसेच सुटीवर आलेले भारतीय सैनिक राजेंद्र पाटील,धनंजय पाटील,बाबाजी पाटील,कैलास माळी, विश्वास शिंपी,,सोमनाथ कोळी व परिसरातील सुटीवर आलेले सैनिक व गावातील माजी सैनिक धोंडू महाजन,दत्तात्रय पाटील दिलीप पाटील, राजेंद्र महाजन पंढरीनाथ महाजन,विजय महाजन,रामेश्वर चौधरी,पोपट माळी आदि विजय महाजन शिवाजी माळी नंतर दोन्ही लहानग्या शिव व शंभू यांनी वडिलांना अखेरचा निरोप देत अग्नीडाग दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button