खान्देशजळगांवसामाजिक

कासोदा येथे वसंत हंकारे यांचे भव्य व्याख्यान

कासोदा येथे वसंत हंकारे यांचे भव्य व्याख्यान

एरंडोल प्रतिनिधी कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने सपोनि. निलेश राजपुत यांच्या संकल्पनेतुन व लोकसहभागातुन तसेच  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यास अनुसरुन अंमलबजावणी करण्यासाठी महीला सक्षमीकरण व महीला/ विध्यार्थीनीमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रा. वसंत हंकारे यांच्या” बाप समजुन घेतांना ” या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महीला वर्गाची उपस्थिती असुन यावेळी. अपर पोलीस अधिक्षक नेरकर  व प्रमुख वक्ते हंकारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

पोलीसांतर्फे कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गांवामध्ये जनजागृती करुन तसेच प्रचार व प्रसार करुन मोठ्या प्रमाणात महीला व विद्यार्थीनींनी येण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महीला व विद्यार्थीनींचा प्रतिसाद मिळून सुमारे 15 ते 16 हजार एवढा जनसमुदाय उपस्थित होता.

सामाजीक बांधीलकी व काळाची गरज म्हणुन महीला समुपदेशन, मार्गदर्शनासाठी पोलीसांतर्फे जिल्ह्यात प्रथम असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कासोदा पोस्टे व ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवुन अभुतपुर्व कार्यक्रम पार पाडला

.डॉ. महेश्वर रेड्डी सर पोलीस अधिक्षक,  श्रीमती कविता नेरकर-पवार अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव, मा. राजेशसिंह चंदेल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश राजपुत व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातुन असा सामाजिक व हळव्या विषयाला धरुन सदर कार्यक्रम आयोजित केल्याने परिसरातून पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button