जळगाव;- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील 34 जणांवर गुन्हे दाखल करत 6 हजार रूपयांचा दंड वसूल केला.
जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा-२००३ (COTPA-२००३) या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवातजळगाव जिल्हा रुग्णालय येथून करण्यात आली. पांडे चौक परिसर, भजे गल्ली, बस स्थानक व तेथिल परिसर, राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाकडील आवर, बी. जे. मार्केट ई. ठिकाणी कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक स्थापित करण्यात आले आहे. या पथकाचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील आहेत. या भरारी पथकात राज्य शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक चिंतामण कनखरे, डॉ.आकाश चौधरी , संदीप पाटील, समुपदेशक निशा कटरे, दन्त सहायक राकेश पाटील, डॉ.उल्हास इंगळे, संपदा गोस्वामी, अनिल गुंजे, राहुल बारहाटे, रुचिका पवार , अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांचा समावेश होता.