जळगाव ;– रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.
आजचा दिवस म्हणजे १२ डिसेंबर आमचे सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थापक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस आणि जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे आजचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना आणि इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते & सत्कार केला होता २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते १ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री राम नाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत