इतर

जळगाव शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पुढे ढकलला, वाचा सविस्तर..

खान्देश टाइम्स न्यूज । १३ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरातील पाणी पुरवठा कधी पुढे ढकलला जाईल याचा काही अंदाजच नाही. आता पुन्हा उद्या दि.१४ डिसेंबर रोजीचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, अजिंठा चौफुलीच्या पुढे कस्तुरी हॉटेलजवळ वाघूरच्या पाणी पुरवठा पाईपमध्ये लागलेली गळती दुरुस्तीकरीता दि.१४ रोजी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत आहे.

दि.१४ रोजीचा होणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा दि.१५ रोजी करण्यात येईल. तसेच दि.१४ रोजी व १५ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.१५ व १६ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button