तांबापुरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले !

तांबापुरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले !
अज्ञात व्यक्ती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौक येथून १३ वर्षीय मुलगा जावेद इरफान काकर हा . “मी खेळायला जातो,” असे सांगून सकाळी घराबाहेर गेलेला जावेद न परतल्याने त्याचे वडील इरफान काकर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान काकर (वय ४५, व्यवसाय – हातमजुरी) हे आपल्या पत्नी, दोन मुली आणि जावेद या १३ वर्षीय मुलासह बिस्मिल्ला चौक, तांबापुरा येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा जावेद हा मनपाच्या उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक ४१ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
११ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास जावेद आपल्या आईच्या सांगण्यावरून टोस्ट आणण्यासाठी दुकानात गेला होता. घरच्यांसमवेत चहा-टोस्ट घेतल्यानंतर तो “खेळायला जातो,” असे सांगून सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंतही जेवणासाठी घरी न परतल्याने पालकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तांबापुरा, मेहरूण, बसस्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, तसेच नातेवाईकांकडे देखील चौकशी केली. मात्र, जावेदचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याचे वडील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.