जळगाव ;– किरकोळ कारणावरून एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कंडारी शिवार घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल सतिष तायडे (वय-३०) रा. चिंचोली ता. यावल ह.मु. परेश रिसॉर्ट कंडारी ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. शनिवार १ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास राहूल तायडे परेश रिसॉर्ट नजीकच्या घरी असतांना काही जण त्यांच्या घराकडे बघत होते. याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वरून कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव या चौघांनी राहूल तायडे, व त्यांची पत्नी आणि मित्र प्रदीप सोनवणे या तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून तिघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर राहूल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ रविंद्र तायडे करीत आहे.