खान्देशगुन्हेजळगांव

रावेर वनविभागाची कारवाई : 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

रावेर वनविभागाची कारवाई : 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

मध्य प्रदेश वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द

जळगाव : रावेर वनपरिक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीवरुन रावेर-चोरवड मार्गावरील मौजे लोणी गावाजवळ मोठी कारवाई करत 5.73 लाख रुपये किंमतीचा अवैध लाकूडसाठा जप्त केला. सदर लाकूडसाठा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीतून आणण्यात आला असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कार्यवाहीसाठी तो मध्य प्रदेश वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.

ही कारवाई दिनांक 5 मे 2025 रोजी गस्तीदरम्यान करण्यात आली. रावेर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, रावेर-चोरवड रस्त्यावर MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक आणि MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवण्यात आले. तपासणी दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले.

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – 5,73,400 रुपये

कारवाईनंतर, सदर गुन्हा मध्य प्रदेशच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार युनुस दाऊदी (वनपाल), आर. डी. काजळे व वीरेंद्र कुमार (वनरक्षक) यांनी घटनास्थळी येऊन जप्त केलेला लाकूडसाठा आणि वाहने ताब्यात घेतली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई

ही कारवाई नीनू सोमराज (वनसंरक्षक – प्रादेशिक, धुळे), जमीर शेख (उपवनसंरक्षक, यावल), आर. आर. सदगीर (विभागीय वन अधिकारी, दक्षता, धुळे) आणि समाधान पाटील (सहा. वनसंरक्षक, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
वनपाल अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडळे खुर्द), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी व वाहनचालक विनोद पाटील यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button