खान्देशगुन्हेजळगांव

ईद-ए-मिलादच्या जुलूसासाठी उत्तम नियोजन; पोलीस व मनपा प्रशासनाचे कमिटीने मानले आभार

ईद-ए-मिलादच्या जुलूसासाठी उत्तम नियोजन; पोलीस व मनपा प्रशासनाचे कमिटीने मानले आभार

जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखल्याबद्दल तसेच जुलूस मार्गावरील खड्डे बुजवून स्वच्छता केल्याबद्दल प्रशासनाचा सत्कार

जळगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी यानिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन आणि जळगाव शहर महानगरपालिकेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मरकझी जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. तसेच जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने मुस्लिमबहुल परिसर, धार्मिक स्थळांचा परिसर तसेच जुलूस जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसराची साफसफाई केली.

प्रशासनाच्या नियोजनामुळे जुलूस निर्विघ्न

पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीचा सण आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरा करता आला. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल मरकझी जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवने, आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपायुक्त समीर बोरोले, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कमिटीचे पदाधिकारी उपस्थित

याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीचे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, मुश्ताक बहेस्ती, अमान बिलाल, कामिल खान, काशिफ टेलर, मुस्तुफा बहेस्ती, इमाम भाया, सय्यद उमर, झिशान हुसैन, आसिफ शाह, जमील शेख, शफी ठेकेदार, अशफाक शाह, सिराज अली, हाशिम कुरेशी आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button