खान्देशजळगांवशासकीय

बळीराजा पाणंद’ला गती; अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज

बळीराजा पाणंद’ला गती; अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज

जळगावात प्रशिक्षण संपन्न; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच शेती कामांना गती मिळावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव येथे व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या प्रशिक्षणात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शासन निर्णयाचा सखोल आढावा

या प्रशिक्षणात १४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयातील तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींवरही चर्चा करण्यात आली. संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

विविध विभागांचा सहभाग

या प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती मंजुषा घाटगे उपस्थित होते. तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीचे लेखाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणाला तज्ज्ञ मार्गदर्शन

प्रशिक्षणाचे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी फैजपूर येथील बबन काकडे यांनी केले. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील विविध टप्पे, अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना

या योजनेअंतर्गत शेत पाणंद रस्ते तयार केल्याने कापणी, मळणी, आंतरमशागत यांसारखी कामे सुलभ होणार असून शेतीमालाची वाहतूक जलद व सुलभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.

तांत्रिक प्रशिक्षण लवकरच

योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

“शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोर पालन करून बळीराजा पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवावी.”
— डॉ. श्रीमंत हारकर, अपर जिल्हाधिकारी, जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button