जळगाव :-आपला पवित्र भारत देश व संविधान सर्व धर्म समभावाला मानणारा असून एक दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांची कदर (सम्मान )करणारा आहे. ख्वाजा मोईनुद्दीन (गरीब नवाझ )रजि. यांचा पवित्र दर्गाह अजमेर येथे 800 (आठशे ) वर्षांपासून कौमी एकता, सांप्रदायिक सद्भाव, राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वात मोठा केंद्र बिंदू असून या दर्ग्यावर जगभरातील विविध धर्म, पंथाचे लोक दर्शनाला येत असतात. दर्ग्यात कोणताही भेदभाव केला जात नाही.
असे असतांना सुध्दा काही वेगळ्या विचारसरणी च्या लोकांनी कोर्टात जाऊन हा दर्गा एका दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळावर उभारण्यात आल्याचा दावा करून दर्ग्यात सर्व्ह करण्यासाठी कोर्टाने संमती दिलेली असून ते अत्त्यंत निंदनीय बाब असून वर्शीप ऍक्ट 1991 या कायद्यानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाची धार्मिक ओळखित कोणताही बदल केला जाऊ शकत नाही. तसेच कोर्टात सुध्दा याबाबतीत सुनावणी होणार नाही असे नमूद आहे. कारण हे दावे करणारे लोक संपूर्ण देशात एका नव्या विवादाला सुरवात करत असून यामुळे धर्मा धर्मात तेढ निर्माण होऊन हे देश व देश वासियांसाठी योग्य नाही म्हणून अजमेर शरीफ दर्गाह व अन्य धार्मिक स्थळांना वर्शीप ऍक्ट 1991 नुसार संरक्षण देण्यात यावे या साठी आज दि. 29 शुक्रवार रोजी दुपारी भिलपुरा Hands भारतीय संविधान प्रेमी मुस्लिम बांधवांच्या तर्फे मोठ्या प्रमाणात जळगांव शहरात स्वाक्षरी मोहीम राबवून महामहिम राष्ट्रपती साहेब भारत सरकार नवी दिल्ली यांना . जिल्हाधिकारी जळगांव यांच्या द्वारे सह्यांचे निवेदन पाठवून त्यात वर्शीप ऍक्ट 1991 नुसार न्याय देण्यात येऊन या अश्या याचिका न्यायालातुन लवकरात लवकर फेटाळण्यात याव्या ही विनंती मांगणी करण्यात आलेली आहे.
या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, हाजी रशीद कुरेशी, अफझल मणियार, अहेमद ठेकेदार, नूरा पहेलवान, नाझीम पेंटर, शफी ठेकेदार, नूर मोहम्मद इ. उपस्थित होते.